करिश्‍माने केले मेहनतीचे सोने | Marathi News I Live Marathi News | आजच्या ठळक बातम्या | Sakal Media

2021-04-28 269

गुमगाव (जि. नागपूर) : योग्य मार्गदर्शन आणि दिशा मिळाल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थीसुद्धा कुठेच मागे नसल्याचे गुमगाव येथील करिश्‍मा गणेश भानुसे या विद्यार्थिनीने दाखवून दिले. कामगाराच्या या मुलीने परिस्थितीवर मात करून मोठ्या जिद्दीने अभ्यास करीत दहावीच्या परीक्षेत 95.80 टक्के गुण मिळवले. बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रातील एका कंपनीत कामगार असलेले गणेश भानुसे गुमगाव येथील रहिवासी आहेत. कितीही कष्ट करायचे,परंतु आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी कुठेही पैसे कमी पडू द्यायचे नाही, हा निर्धार मनाशी बाळगून दिवस-रात्र एक करून वडील गणेश आणि आई वनिता स्वप्न बघायचे. आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवत करिश्‍माने दहावीच्या परीक्षेत गुमगाव येथील यशवंत हायस्कूलमधून प्रथम येण्याचा मान पटकाविला.
(व्हिडिओ : रवींद्र कुंभारे)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Free Traffic Exchange

Videos similaires